सकाळपासून रात्रीपर्यंत अपू आपल्या आई, बाबा, आजीसोबत खेळतो, गप्पा मारतो. त्याला कधी छान वाटतं, कधी राग येतो, कधी गंमत वाटते तर कधी वाईट वाटतं. छोट्या 'अपू'ला हे सगळं का होतं हे 'नाही माहित'. यातल्या गोष्टी वाचून तुम्ही सांगा बरं तुम्हाला माहितीये?
माधुरी पुरंदरे यांनी मुलांच्या वागण्या बोलण्यातले बारकावे टिपत हे छानसं पुस्तक आपल्या भेटीला आणलं आहे, ते आपल्या मुलांबरोबर नक्की वाचा.