मुलांचं पालकांना सहकार्य का मिळत नाही? मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे हवं तसं वागू द्यावं का? मुलांच्या कलाने घ्यावं म्हणजे नक्की काय? डॉ. दिनेश नेहेते सरांकडून मुलांची मानसिकता, नैसर्गिक मर्यादा, त्यांच्या भावनिक विकासाचे टप्पे याविषयी जाणून घेऊ या. सरांशी प्रत्यक्ष संवाद साधून, प्रश्नोत्तरांमधून आपल्या शंका मिटवण्याची ही चांगली संधी आहे. आईबाबा दोघेही आल्यास तिकिटात सवलत आहे त्याचा लाभ नक्की घ्या.