टुण् टुण् अशा उड्या मारणारा एक होता बेडूक ! त्याच्या उड्यांप्रमाणेच त्याचं नावही 'टुणटुण' असंच होतं. जग कित्ती मोठ्ठं आहे हे बघण्यासाठी तो निघाला फार दूरच्या प्रवासाला. आणि मग कधी मोटारगाडी, सायकलवर तर कधी कुणाच्या खिशातून अगदी पोटावरून ही उड्या मारत मारत त्यानं केलेल्या धम्माल प्रवासाविषयी तुम्हाला ऐकायला, पाहायला आवडेल ना ? म्हणूनच,आपल्या सुखायनतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी लिहिलेल्या या 'टुणटुण बेडकाचा प्रवास' आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहेत मीना सासणे आणि डॉ नीतीन मोरे. चला तर मग तयार आहात ना ?