‘गोष्टी’ ही आपल्या सगळ्यांच्याच बालपणातली एक खूप नाजूक आणि सुंदर आठवण आहे. गोष्ट ऐकायला आवडतच नाही असं एकही मूल सापडणार नाही. आपण लहान असताना हट्ट करून गोष्टींची, चित्रांची पुस्तकं घ्यायचो, आजी- आजोबा गोष्टींची पोतडी घेऊन आले की आपल्याला फार आवडायचं. पण काळ बदलत गेला आणि पुस्तकांची जागा YouTube ने घेतली, रंजक गोष्टींची जागा ट्रेंडिंग रिल्सने घेतली आणि गप्पा मरणाऱ्या माणसांची जागा आता मोबाईलने घेतली आहे. Screentime आणि AI च्या ह्या नवीन चॅलेंजला सामोरं जाणं खरंच कठीण आहे, म्हणूनच ह्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही चिकूपिकूची सुरुवात केली. टेक्नॉलॉजीमध्ये होणाऱ्या वेगवान बदलांचा लहान मुलांवर काय आणि कसा परिणाम होत आहे ह्याची दखल आपण पालकांनी, शिक्षकांनी वेळोवेळी घेतली पाहिजे, आणि मुलांना त्यांच्या हक्काचं बालपण दिलं पाहिजे. गोष्टींना दैनंदिन जीवनाचा भाग केल्याने आपण empathy आणि human intelligence ला आकार देत असतो.
ह्या लेखात आपण लहान मुलांना गोष्टी सांगण्याचे म्हणजेच Storytelling चे काय आणि कसे फायदे होतात ते बघणार आहोत.
पोटातलं बाळही ऐकत असतं हां…
- पोटात असताना, वाढीच्या एका टप्प्यानंतर आईचा आवाज बाळ ऐकत असतं. म्हणून especially बाबा लोकहो, बाळाला तुम्हीपण भरपूर गोष्टी सांगा, त्यांच्यासाठी गाणी गा. ह्यामुळे बाळासोबत एक bond तयार व्हायला मदत होते.
- पोटातल्या बाळाला ऐकू येतं, पण अजून भाषा समजलेली नसते. बाळाला बाहेरच्या जगाची ओळख ही आधी आवाजामार्फतच होत असते. पण या टप्प्यावर काय सांगतो, बोलतो यापेक्षा या गोष्टी कशा सांगितल्या जातात हे जास्त महत्त्वाचं असू शकतं. आवाजातला नाजूकपणा, soothing effect इथे महत्त्वाचा ठरतो.
शून्य ते दोन वर्षांची पायरी चढताना छोट्या गोष्टी, सुरेल गाणी मुलांना ऐकवू या कारण,
गोष्टीं सांगताना वेगवेगळे आवाज कानावर पडल्यामुळे वेगवेगळ्या भावना मुलांना अनुभवायला, पाहायला मिळतात आणि साहजिकच मुलं अधिक expressive होतात.
- Rhyme, Rhythm आणि Repetition हे बाळांना खूप आनंद देतं आणि Sense Of Safety देतात. ह्यातून बाळांना भाषेची, पॅटर्नची ओळख होऊ लागते.
- गोष्टीतल्या चित्रांच्या माध्यमातून मुलांना बाहेरच्या जगाची ओळख व्ह्यायला सुरुवात होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींची चित्र, त्यांचे आवाज ऐकून त्याबद्दल कुतूहल तयार व्हायला सुरुवात होते.
- लक्ष कसं द्यायचं आणि शिकायचं कसं हेसुद्धा गोष्टी ऐकता ऐकता मुलांना कळत जातं.
पालक मुलांशी संवादामार्फत आणि गोष्टींमार्फत जितके शब्द बोलतात त्यावर मूल दोन वर्षांचं असताना त्याला किती शब्द माहीत असतात हे ठरतं. जितक्या जास्त गोष्टी तितकी जास्त शब्दसंपदा!
चिकूपिकूच्या जम्मत गोष्टी ह्या app मध्ये तुम्ही भरपूर गोष्टी ऐकू शकता.
दोन ते सहा वर्षांची मुलं जेव्हा गोष्ट ऐकतात,
जेव्हा एखाद्या मुलाला कुठलाही नवीन अनुभव मिळतो तेव्हा त्याचा मेंदू बदल detect करून नवीन neuron connections तयार करत जातो, जितकी जास्त connections तितका जास्त सुदृढ मेंदू. प्रत्यक्ष अनुभवांबरोबरच गोष्टींतून हे अनुभव देणंही गरजेचं आहे. ह्या वयात मुलांची भाषिक, socio emotional आणि cognitive कौशल्यं तयार होत असतात आणि भाषा शिकण्यासाठी गोष्टी वाचणं आणि ऐकणं हे अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकतं.
- गोष्टी ऐकल्याने मुलांना भाषा शिकायला मदत होते, शब्दसंपत्तीत भर पडते. त्यामुळे मुलं आपले विचार खणखणीत आणि जास्त effectively मांडू शकतात.
- गोष्टींमुळे वाक्यरचना, structural मांडणी, घटनाक्रम ह्यांचा अंदाज मुलांना स्वतंत्रपणे बांधता येतो, ह्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.
- अनेकदा मुलांना काही ठरावीक गोष्टी परत परत ऐकायला आवडतात आणि पालकांना ते थोडं कंटाळवाणं वाटू शकतं, पण Repetition वाढत्या मेंदूच्या hard wiring साठी मदत करतं. मुलं कोणत्या गोष्टी परत परत ऐकवायला सांगतात ह्यावरून मुलांच्या भावनांचा, आवडी निवडींचा कल आपण ओळखू शकतो.
- ह्या वयात मुलांच्या समोर पुस्तकं ठेवून गोष्ट वाचल्यास त्यांना वाचनाची, पुस्तकांची आवड लागते आणि ही आवड त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते, वाचनाची आवड सगळ्याच क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी पोषक ठरते.
- आपण मुलांना चांगल्या सवयी लागाव्या ह्यासाठी सतत आणि सजक प्रयत्न करत असतोच पण त्याचबरोबर values, emotions, empathy ह्या सारख्या अमूर्त गोष्टी समजावताना गोष्टींची खूप मदत होते.
चिकूपिकूच्या सहा ते बारा- गोष्टी ऐकता-ऐकता स्वतःची गोष्ट घडवणारी मुलं
ह्या वयात मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकासही होत असतो. शालेय जीवनात नवीन विषयांची ओळख होते, काही सोशल situations मध्ये मुलं पालकांशिवाय स्वतःची स्वतः expose होऊ लागतात. त्यांची भाषेची पकड अधिक मजबूत होत असते.
- गोष्टी वाचून मुलांची कल्पनाशक्ती वाढते. चांगली कल्पनाशक्ती असलेली मुलं शक्यतांचा विचार करू शकतात आणि त्यातून त्यांचे problem solving skills वाढीस लागतात. एखादी समस्या आपण आपली सोडवू शकतो हा विचारच मुलांचा आत्मविश्वास वाढवतो.
- गोष्टी वाचल्याने मुलांची संवाद कौशल्य आकार घेऊ लागतात, विचार व्यक्त करण्यासाठीचा संदर्भ मुलांना कळत नकळत गोष्टींतून मिळत जातो. वेगवेगळ्या भाषेत गोष्टी ऐकताना, त्या भाषेची गोडी निर्माण होते.
- मुलांची आपल्या संस्कृतीशी ओळखही गोष्टींमार्फत होत असते. वाचनामुळे मुलांचे ज्ञान, माहिती वाढते आणि इतर संस्कृतींबद्दल आदर आणि संवेदनशीलता वाढते, जगाशी ओळख होऊ लागते.
- गोष्टी वाचून मुलं भरपूर प्रश्न विचारतात, गोष्टीतली पात्रं बघून उत्तर शोधण्याचा प्रयत्नही करतात.
आज AI च्या जगात आपल्यावर काय विचार करायचा हे सांगणाऱ्या माहितीचा भडिमार होत आहे, मुलांसाठी हे long run मध्ये सुद्धा overwhelming ठरू शकतं. पण गोष्टी मुलांना विचार कसा करायचा इतकंच अलगदपणे सांगतात. चिकूपिकू ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये तुमच्यासाठी छान गोष्टी घेऊन येत राहील.
तुम्ही मुलांसोबत गोष्टी वाचत राहा, ऐकत राहा, आम्ही गोष्टी सांगत राहू.
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs