उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की घरात एकच आवाज ऐकू येतो…
“आई, मला bore होतंय!” 😄
पहिले काही दिवस मजेत जातात - उशिरा उठणं, आवडता खाऊ, थोडा खेळ…
पण मग हळूहळू मुलं घरभर फिरायला लागतात -
“आई… काय करू?”
“आई… माझ्यासोबत खेळ ना!”
“आई… काहीतरी दे ना!”
आणि मग शेवटी उपाय म्हणून मोबाईल किंवा टीव्ही त्यांच्या हातात जातो…
पण खरंच, मुलांना व्यस्त ठेवणं म्हणजे स्क्रीन देणं का?
की या सुट्टीत त्यांना काहीतरी मजेदार + शिकण्यासारखं देता येईल?
कारण बालपण हे त्यांच्या शिकण्याच्या आणि मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं असतं.
विशेषतः २ ते ६ वर्षं हा काळ तर “सुपर फास्ट लर्निंग” चा असतो!
म्हणूनच या सुट्टीत मुलांसाठी screen-free, मजेदार आणि smart activities खूप गरजेच्या आहेत.
चला तर मग पाहू या वयानुसार मुलांसाठी सोप्या आणि मजेदार अॅक्टिव्हिटीज
२ ते ३ वर्षे - “सगळं हातात घेऊन बघण्याचं वय”
या वयातली मुलं काही Scientist पेक्षा कमी नसतात! प्रत्येक वस्तू उचलून बघणं, फेकून बघणं… आणि हो, तोंडात घालून पाहणं ही तर त्यांची आवडती Activity! या वयात मुलं रंग, आवाज, स्पर्श आणि हालचालींमधून शिकतात. त्यामुळे सोप्या आणि आकर्षक अॅक्टिव्हिटी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतात.
-
रंगीत ब्लॉक्स, कार्ड्स किंवा खेळण्यांद्वारे त्यांना रंग ओळखायला शिकवा. जसे लाल, पिवळा, निळा रंग वेगळे करून दाखवा आणि त्यांना ते रंग शोधायला सांगा.
-
मुलांना रोज Stories सांगण्याची सवय लावा. चित्रांसह असलेली पुस्तकं त्यांना खूप आकर्षित करतात. त्यामुळे गोष्टी सांगताना चित्रांमधून त्यांना समजावून सांगा.
-
मुलांना पाण्याचे खेळ खेळायला दया, काय बुडतं काय तरंगतं हे सांगा, झाडांना पाणी घालायला शिकवा. (पाणी सांडल्यावर थोडंसं पुसायला ही शिकता येईल)
यामुळे काय होते?
- निरीक्षण कौशल्य वाढते
- स्मरणशक्ती सुधारते
- ऐकण्याची क्षमता वाढते
- कल्पनाशक्ती विकसित होते
३ ते ५ वर्षे - कल्पनाशक्तीला पंख फुटण्याचं वय
या वयात घरात अचानक डॉक्टर, शिक्षक, शेफ, सुपरहीरो सगळीच पात्रं हजर होतात! तुमचं मूल कधी तुम्हालाच शिकवतं, तर कधी Injection सुद्धा देतं. Role play हा या वयातला सगळ्यात सुंदर खेळ आहे. कारण त्यातून ते जग समजून घेत असतात आणि कधी कधी त्यांच्या भावनाही व्यक्त करत असतात.
-
मुलांना रंगीत पेन्सिल किंवा क्रेयॉन्स द्या आणि त्यांना मोकळेपणाने चित्र काढू द्या. त्यांना फक्त नियम सांगू नका; त्यांच्या कल्पनेनुसार त्यांना व्यक्त होऊ द्या.
-
पेपर क्राफ्टसाठी कागदाची फुलं, प्राणी, डेकोरेशनच्या सोप्या गोष्टी करू द्या. शक्य असेल तर तुम्हीही त्यांच्यासोबत बसून क्राफ्ट करा.
-
पझल्स देखील खूप उपयुक्त ठरतात. सध्या बाजारात वेगवेगळे पझल्स मिळतात, तसेच ChikuPiku.com वरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
-
मुलांसोबत घरतल्या घरात एक छान नाटुकली बसावा. जास्त आवड असेल तर बाल नाटकं दाखवा.
यामुळे काय होते?
- कलात्मकता वाढते
- सूक्ष्म हालचालींचं कौशल्य सुधारते
- लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते
- समस्या सोडवण्याची सवय लागते
५ ते ७ वर्षे - प्रश्नांचा भडिमार
या वयात पालकांची खरी परीक्षा सुरू होते!
“आकाश निळं का असतं?”
“चंद्र आपल्यामागे का येतो?”
“पाण्याला रंग का नसतो?”
त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्यालाच नाकी नऊ येतात! या जिज्ञासू वृत्तीला योग्य दिशा द्यायची असेल, तर त्यांच्या आवडी ओळखून त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे.
-
मुलांसोबत सोपे विज्ञान प्रयोग करा. पाण्यात रंग मिसळणं, काय बुडतं आणि काय तरंगतं हे पाहणं अशा गोष्टी त्यांच्यासाठी जादूसारख्या असतात.
-
त्यांना गोष्टी वाचायला सांगा. गोष्ट वाचताना मध्येच थांबा आणि विचारा, “पुढे काय होईल असं तुला वाटतं?” त्यांच्या उत्तरांमधून त्यांची कल्पनाशक्ती दिसून येते.
-
Ludo, Snake & Ladder, memory games सारखे खेळ खेळा. यामुळे counting, planning आणि patience शिकायला मदत होते.
-
सोसायटी मध्ये छोटासा Book Club सुरू करा, मुलांना वाचनाची गोडी लावायला चिकूपिकूचे अंक तर आहेतच शिवाय चिकूपिकू च्या website वर वयाप्रमाणे आवडतील अशी भरपूर पुस्तकं सुद्धा आहेत, मित्र मैत्रिणींमध्ये एकमेकांची पुस्तकं Exchange करा.
-
मुलांच्या आवडी जोपासायला किंवा आवडी शोधायला उन्हाळी शिबिरं एक मस्त माध्यम आहे. नाटक, चित्रकला, भाषा, मैदानी खेळ किंवा थोड्या मोठ्या मुलांसाठी ट्रेकिंग/कॅंपिंग असे भरपूर पर्याय हल्ली सापडतात.
यामुळे काय होते?
- जिज्ञासू वृत्ती वाढते
- विचार करण्याची सवय लागते
- निरीक्षण क्षमता सुधारते
- समस्या सोडवण्याची सवय तयार होते
- आत्मविश्वास वाढतो
७ ते ९ वर्षे - छोट्या हातांनी मोठ्या गोष्टी करण्याचं वय
या वयात मुलांना “मी मोठा झालोय!” असं वाटायला लागतं आणि घरात एक वाक्य नेहमी ऐकू येतं, “आई, मी स्वतः करतो गं!” शूज बांधणं असो, बॅग भरायची असो किंवा स्वयंपाकघरात काहीतरी करायचं असो; त्यांना सगळं स्वतः करून बघायचं असतं. कधी ते बरोबर करतात, कधी गोंधळ घालतात, आणि कधी “आई, थोडी मदत कर ना…” म्हणतात. पण या वयात त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो, त्यामुळे योग्य सवयी आणि दिशा देणं महत्त्वाचं आहे.
-
मुलांना छोट्या जबाबदाऱ्या द्या जसं की कपाट आवरणं, बॅग तयार करणं, घरकामात मदत करणं.
-
छोट्या writing activities द्या. “आजचा दिवस कसा गेला?” अर्थात दिनचर्या लिहायला सांगा किंवा एखादी छोटी गोष्ट स्वतः लिहायला सांगा.
-
बाहेर खेळणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत वेळ घालवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
-
Be a tourist in your own city - बऱ्याचदा आपण आपल्या शहरात राहत असलो तरी किती तरी जागा आपण पाहिलेल्याच नसतात. किल्ले, मंदिर, नदी, ऐतिहासिक ठिकाणं, संग्रहालये अशी अनेक ठिकाणं नव्याने मुलांसोबत अनुभवू.
-
मुलांना तुमच्यासोबत जवळच्या मंडईत घेऊन जा, जवळची बाग, जवळचा बाजार मार्केट दाखवा, हा मुलांसाठी एक प्रतिकल अनुभव असेल. मुलांना शक्यतो शहरातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट ने सगळीकडे फिरवा तोही एक वेगळा अनुभ असेल.
यामुळे काय होते?
- Creativity वाढते
- एकाग्रता सुधारते
- कष्ट करण्याची सवय लागते
- स्वतः निर्णय घेण्याची सवय लागते
स्क्रीन-फ्री अॅक्टिव्हिटीचे महत्त्व
आजकाल मुलं शांत बसावीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो अगदी मीरासारखं!
पण खरं शिकणं स्क्रीनवर कमी आणि अनुभवातून जास्त होतं. मुलं जेव्हा हाताने काहीतरी करतात. रंगवतात, कापतात, चिकटवतात किंवा बाहेर खेळतात तेव्हा त्यांचा सर्वांगीण विकास होतो. स्क्रीनवर ते फक्त बघतात… पण स्क्रीनशिवाय ते विचार करतात आणि शिकतात.
पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स
-
मुलांना perfect होण्याच pressure देऊ नका. ते त्यांच्या पद्धतीने करू द्या आणि त्याचं कौतुक करा.
-
दररोज ३०-३५ मिनिटं जरी तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी बोला.
-
मुलांची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक मूल वेगळं असतं.
ChikuPiku.com कसे मदत करते?
आजच्या डिजिटल जगात योग्य content निवडणं खूप महत्त्वाचं आहे. ChikuPiku.com वर मुलांसाठी खास तयार केलेल्या गोष्टी, कविता, अॅक्टिव्हिटी आणि पझल्स मिळतात, जे केवळ मनोरंजन नाही तर शिकण्याची मजा वाढवतात. मुलांच्या वयानुसार आणि आवडीनुसार तयार केलेलं content असल्यामुळे शिकणं अधिक सोपं आणि आनंददायी होतं.
निष्कर्ष
मुलांना व्यस्त ठेवणं सोपं आहे स्क्रीन द्या आणि काम संपलं!
पण त्यांना घडवणं महत्त्वाचं आहे आणि ते फक्त अॅक्टिव्हिटी, खेळ आणि तुमच्या सहवासातूनच शक्य होतं. महागडी साधनं किंवा मोठे प्लॅन्स गरजेचे नाहीत… फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडी creativity.
कारण शेवटी मुलांना activity नाही…तुमची साथ हवी असते.
