चिकूपिकूच्या ५ बेस्टसेलर मासिकांचा संच आम्ही पुन्हा आणला आहे. पूर्वीचे खूप छान अंक, त्यातल्या धमाल गोष्टी आणि भन्नाट ऍक्टिव्हिटीज सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी लोकाग्रहास्तव ही खास ऑफर! प्राणी, मुंग्या, पावसाळा, गणपती बाप्पा अश्या थीम्स असलेली मासिके आणि गोष्टी, गाण्यांसह वेगवेगळ्या ४० ऍक्टिव्हिटीज असलेला मोठा सुट्टी विशेषांक या पॅकमध्ये आहे. नवीन सभासदांना हे आधीचे अंक वाचून नक्कीच मजा येईल तसेच ओळखीच्या छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही देता येईल.
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करण हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
नोट: चिकूपिकू मासिकाच्या वार्षिक वर्गणीमध्ये ( Yearly Subscription) सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक हे मोठे जोड-अंक समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे वर्गणीदारांनी दिवाळी विशेषांक स्वतंत्र विकत घेऊ नये.