मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.
छोट्या मुलांसाठी खास, दिवाळीची मजा आणखी वाढवणारा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!!
मोठ्यांना दिवाळीची भरपूर तयारी, कामं असतात पण लहान मेम्बरसुद्धा काही कमी बिझी नसतात. त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीची भरपूर कामं असतात. आणि मुलांचं काम म्हणजे काय .. तर खेळ, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज आणि मज्जा. या सगळ्यात त्यांच्या जोडीला येतो चिकूपिकू दिवाळी विशेषांक.
दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!