या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities!
बरोब्बर, या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे.. 'अद्भुत'! खरं म्हणजे, आपल्या अवती भोवती खूप अद्भुत गोष्टी असतात. लहानपणी पहिले-वहिले सगळेच अनुभव मुलांंसाठी अद्भुत असतात. पण आपण जसे मोठे होत जातो तसंं 'अरे कसलंं भारी आहे!' वाटणंं कमी होत जातंं आणि 'त्यात काय एवढंं?' जास्त वाटायला लाागतंं.
विविध अद्भुत गोष्टी टिपायचा आणि साठवायचा प्रयत्न आम्ही या विशेष दिवाळी अंकात केला आहे. चांदोबाची मैत्रीण, काजवराणी, स्वप्नांची खोली, शब्दांचं गाठोडं, सायकलवरचं घर अशा भरपूर गोष्टी ह्या अंकात आहेत तसेच ‘देते कोण देते कोण’, ‘फुले फुले ढोले ढोले’, ‘अट्टम पट्टम घट्टम’ अशा रंजक कविता सुद्धा आहेत.
चला तर मग, यंंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुलांंबरोबर आपणही कुतूहल आणि कल्पनाशक्ती जागी करत अद्भुत गोष्टी बघू या, ऐकू या आणि करू या.
प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर activities, कोडी, कविता, हातांनी करून बघण्याची खेळणी, चित्रकला, कोलाजकाम, मातीकाम आणि अशा अनेक धम्माल गोष्टींनी गच्च भरलेला आहे हा दिवाळी अंक!दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!