डिसेंबर महिन्याचा हा अंक अगदी थंड आणि गारेगार आहे. शेवटच्या पानापर्यंत ही थंडी पसरलेली आहे. अंकातल्या बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या अवतीभवती गुंफलेल्या आहेत. अनेक गोष्टी मुलांसाठी नवीन असतात, त्यांचं नवल त्यांना वाटतं. मुलांसोबत अंक वाचताना आपणही आपली पाटी कोरी करू या सगळ्यातली मजा अनुभवू या. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. साताऱ्याचा म्हातारा २. ग्रीझलीची झोप ३. रिठा ४. हातांची जादू
आपल्या आजूबाजूला होणारे बदल, त्यातलं कुतूहल, निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधली गंमत मांडण्याचा प्रयत्न डिसेंबरच्या अंकात केला आहे. झाडांना थंडी वाजते का? ग्रीझली अस्वल संपूर्ण हिवाळ्यात का झोपून असतं? सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात आपले सैनिक कसे बरं राहतात? अशा गोष्टी ऐकताना मुलांना गंमत वाटेल, प्रश्न पडतील आणि गप्पाही होतील. शेकोटीचं गाणं एकत्र म्हणताना धमाल येईल. गोधडीची आणि ख्रिसमस ट्रीची ॲक्टिव्हिटी मुलांबरोबर नक्की करून बघू या. थंडीची मजा अनुभवू या.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
Binding |
Paperback |