'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत. दहा-दहा मुंग्या घरी आल्यावर काय गंमत झाली? पृथ्वीशी खेळायला कोणीच नाही म्हणून ती रुसून बसली, तेव्हा सूर्याने काय केलं? आंबे खाताना छोटू-मोठूने काय बरं गडबड करून ठेवली? या मजेशीर गोष्टी वाचायला मुलांना नक्की आवडतील. मावशीच्या लग्नाला कोण येणार, लग्नात काय खाणार, कोणते कपडे घालून कसं नटणार याचा भन्नाट प्लॅन सांगणारी एक कविता आणि बंद पडलेल्या विमानाची जगावेगळी दुरुस्तीसुद्धा या सेटमधल्या पुस्तकात आहे. हा वयोगट १ ते ५ साठी परफेक्ट पुस्तकसंच आहे.
डॉ. अमृता बेडेकर यांनी सोप्या, छोट्या वाक्यात लिहिलेल्या मुलांच्या विश्वातल्या गोष्टी, सौ. सायली दामले यांनी काढलेली अप्रतिम चित्रे, उत्तम निर्मितीमूल्यं ही या पुस्तकांची खासियत आहे.