लहान मुलांना ताल, ठेका समजतो. सोप्या लयीतली गाणी त्यांना सहज पाठ होतात आणि म्हणायलाही आवडतात. हे पुस्तक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलं आहे. गाण्यांमधले प्रसंग, शब्द, चित्रं त्यांना आपलेसे वाटतील. यातली गाणी ऑडिओ स्वरूपातही दिलेली आहेत.
विद्याधर शुक्ल यांनी चिकूपिकूसाठी लिहिलेल्या निवडक गाणी आणि कवितांचं हे पुस्तक आहे ज्यात छोट्या डब्बूपासून ढब्बू ढगापर्यंत आणि गोड माऊपासून गावाकडच्या खाऊपर्यंत अनेक विषयांवरच्या कविता आहेत.
मुलांबरोबर मोठ्यांदा, अभिनय करत गाणी म्हणा. अगदी पालथं पडून कविता वाचा. चित्रं बघा. छोट्या मुलांना जेवण भरवताना ही गंमतगाणी साथीला येतील. शाळेत कविता सादर करायलासुद्धा उपयोगी ठरतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आई-बाबा, आजी-आजोबांबरोबर मिळून गाणी म्हणताना मजा येईल.
मोठं होत असताना ही गंमत गाणी मुलांच्याबरोबर असतील आणि कायम लक्षात राहतील.