एका माशीमुळे काय काय घोटाळा झाला ते या गमतीशीर गोष्टीत नक्की वाचा. माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या या गोष्टीसाठी सुंदर चित्रेही त्यांनीच काढली आहेत. एकामागे एक काय काय घडत जातं आणि कसा गोंधळ उडतो हे मुलांना या गोष्टीतून ऐकायला नक्कीच आवडेल.
अक्षर ओळख नसलेल्या मुलांना चित्रं दाखवून गोष्ट सांगू या. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील. अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील.