प्रत्येकी ७ गेम असलेले, खेळताना धमाल येईल, कुठेही सहज घेऊन जाता येतील असे दोन बोर्ड गेम्स या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.
बोर्डगेम १ - रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, अनोखी सापशिडी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित खेळ.
बोर्डगेम २ - सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, डायनोसॉर, समुद्रात राहणारी फिशिरा, अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफर अशा भन्नाट थीम्सवरचे गेम.
मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊन जाऊ शकतील आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल. छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.