कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश.
अंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.