Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते

मुलांना स्वरांची आणि व्यंजनांची ओळख करून देणारी ही फ्लॅशकार्ड्स म्हणजेच अक्षरपत्ते मराठी अक्षरओळख आणि वाचन यासाठी अतिशय उपयोगी आहेत.  
इंग्रजी अल्फाबेट्स बघून बघून येतात तशीच मराठी भाषा पण सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते आहेत ... 'याची जोडी शोध' अशा सोप्या खेळापासून सुरुवात करता येईल. प्रत्येक अक्षराच्या मागे त्याचे शब्द दिले आहेत. अक्षराचा आवाज ओळखीचा होण्यासाठी हे शब्द उपयोगी पडतील. अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स दाखवले आहेत त्यावरून बोट फिरवून अक्षराची, त्याच्या आकाराची ओळख होईल.
या एका बॉक्समध्ये 52 अक्षरपत्ते, 14 स्वरचिन्हांचे पत्ते अशा 66 पत्त्यांचे दोन सेट आहेत. म्हणजे टोटल 132 कार्ड्स. याशिवाय पत्ते कसे वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील यासाठी माहितीपत्रक आणि बाराखडी तक्ता आहे. 
  1. स्वर-पत्ते वेगळ्या रंगात दिले आहेत. 
  2. व्यंजनांचे प्रत्येक गट वेगवेगळ्या रंगाचे आहेत. 
  3. स्वरचिन्हांचे वेगळ्या आकाराचे पत्ते दिले आहेत ते जोडून बाराखडी करता येईल. काना, मात्रा, वेलांटी इत्यादी. 
  4. अक्षर ओळख, बाराखडी, शब्दवाचन आणि शब्द तयार करणे अशा टप्प्यांनी पुढे जाता येईल. 
  5. पत्ते एका शेजारी एक मांडून शब्द तयार करता येतील. 
  6. मुलांच्या वाचनाच्या लेव्हल प्रमाणे किंवा वयाप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळता येतील. पत्त्यांबरोबर खेळांची यादी दिली आहे. 

₹299.00

Shipping calculated at checkout.
Out of stock

Language - Marathi

Author - Abha Bhagwat

Marathi Barakhadi Flashcards: The Fun Way to Learn the Alphabet

Introduce your kids to the Marathi Alphabet with a learning tool designed for the modern Indian Children! While children often pick up English visually, our Marathi Varnamala Flash Cards ensure they master their native tongue just as effortlessly. Far more engaging than a static Barakhadi Chart for Kids hanging on a wall, this set serves as an interactive Marathi Barakhadi Games Board that brings the alphabet in marathi language to life.

Inside the box, you will find 132 Letters Flash Cards covering the entire varnmala in marathi. We have designed these to be the ultimate Alphabet Board Game for 3+ Year Old Kids. The set includes two copies of every letter, making it perfect for memory games, and features directional strokes so kids can trace and learn the shape of every mulakshare in marathi.

This kit guides your child through essential learning stages: from basic Marathi Akashar Olakh to constructing the full marathi barakhadi using special color-coded vowel sign cards. It is a major upgrade from standard alphabet flash cards because it evolves into an Alphabet Word Game (Marathi) where kids arrange cards side-by-side to build real words.

Product Highlights at a Glance

  1. Comprehensive: 132 cards ensuring plenty of repetition and gameplay variations.
  2. Visual Learning: Colorful designs make the varnmala in marathi attractive to young eyes.
  3. Skill Building: Covers everything from basic Marathi Akashar olakh to complex word formation.
  4. Self-Paced: Perfect for 3+ year olds to learn at their own speed, moving from simple matching to reading words.

Order the Best Alphabet Board Game for 3+ Year Old Kids Today! Turn the daunting task of learning Marathi into your child favorite time of the day.

FAQ's

माझं मूल अजून वाचत नाही, लहान आहे. आत्तापासून कशाला पुस्तकं घ्यायची?

अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.

इंग्लिश मिडीयमच्या मुलांना हे कसं उपयोगी पडेल?

मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात

मलाच मराठीमधलं एवढं छान वाचता येत नाही. मुलांना कसं वाचून दाखवणार?

आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.

नक्की कोणत्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे चिकूपिकू?

हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.

काय काय येतं सबस्क्रिप्शन मध्ये?

सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.

कोणत्याही महिन्यात सुरू करता येतं का?

ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Marathi Varnamala Flash Cards | Marathi Barakhadi | अक्षरपत्ते

₹299.00