उत्साह, चौकस वृत्ती, संवेदनशीलता निसर्गाच्या जवळ जाऊन नक्कीच वाढतात. या अंकातल्या चित्रांमधून, गोष्टींमधून निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटेल. निसर्गाशी मुलांची नाळ जुळवून ठेवता यावी यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्याला करता येतील. आसपास दिसणारी झाडं, पक्षी, किडे यांचं मुलांबरोबर आपणही निरीक्षण करायला हवं. त्यांच्याविषयी बोलत राहायला हवं.
पाऊस – पाणी हा विषय तसा नेहेमीचा, पण त्याची जादू न संपणारी आहे. पाण्यात खेळायची भारी गंमत मुलांना वाटते. पावसाळ्यात खुलणारा निसर्ग, थेंबांचं, ढगांचं, नदीचं प्रत्येकवेळी दिसणारं निराळं रूप ही सगळी पाण्याची जादू दाखवण्याचा प्रयत्न अंकात केला आहे. पावसासारखीच या अंकातली चित्रंही सुंदर झालेली आहेत. वेगवेगळ्या शैलीतली ही चित्रं मुलांसोबत नक्की बघा. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. फिशिराची गोष्ट २. चित्रडोकू ३. पाण्याचं गाणं ४. घुराव घुरुक
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
Binding |
Paperback |