लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर गोष्टी-गाणी सादर करणं ही सगळी कौशल्यं आहेत. ती आत्मसात करण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना साहस दाखवावं लागतं. या वेळचा चिकूपिकूचा अंक हा अशाच छोट्या छोट्या साहसांकडे लक्ष वेधणारा आहे.
या वेळच्या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांमध्ये बहुआयामी बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी खास अॅक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या सोप्या आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत, मुख्य म्हणजे या अॅक्टिव्हिटीजचा विविध बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईल. त्यावरून मुलांचा कल साधारणपणे कोणत्या दिशेला आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
64 |
Binding |
Paperback |