लहान मुलांसाठी एकवीस पुस्तकांचा हा सेट आहे. यात 2 ते 8 वर्षाच्या वयोगटासाठी पुस्तकं आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही पुस्तकांत अगदी कमी मजकूर आहे – मुलांना अक्षरओळख होऊ लागली की ती स्वतःच वाचू लागतील. तुम्ही तुमच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवा आणि त्यांच्या सोबत मजेत वेळ घालवा. लहान आकाराची पुस्तकं 1-2 मुलांसोबत वाचता येतील, तर मोठ्या आकाराची पुस्तकं वर्गात किंवा 8-10 मुलांच्या गटासोबत वापरता येतील.