चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. "इल्लु इल्लु पिल्लू" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या.
हा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!