एक ससा जंगलात फिरत असताना त्याला एक रिकामी गुहा दिसते. तो गुहेत शिरतो आणि दार लावून घेतो. ती गुहा एका वाघाची असते. वाघ परत येतो तेव्हा गुहेचे दार बंद बघून मोठ्याने ओरडून विचारतो की आतमध्ये कोण आहे. ससा वेगळाच आवाज काढून वाघाला घाबरवतो आणि धमकी देतो. वाघ घाबरून इतर प्राण्यांची मदत घेतो, पण ससा सर्वांनाच धमक्या देतो. पुढे काय होते? सगळे प्राणी मिळून सशाला पकडतात का? ही एक पारंपरिक गोष्ट आहे. गोष्टीत वारंवार येणाऱ्या पालुपदांमुळे २ ते ५ वर्षांच्या मुलांना ही गोष्ट ऐकायला खूप आवडते.
Age Group: 2 to 5 years
A rabbit sees an empty cave in the jungle. He enters the cave and locks the door. The cave belongs to a tiger. When the tiger sees the door closed, he asks loudly who is inside. The rabbit speaks in a louder voice and scares the tiger away. Other animals in the jungle try to help the tiger, but the rabbit scares them away, too. Do they finally succeed in identifying the rabbit? Children find this traditional story quite enjoyable.