ग्रामीण भागातला आठवडी बाजार म्हणजे रंगांची उधळण असते. भाजीपाला, फळे, मसाले, कपडे अशा शेकडो वस्तू या बाजाराला रंगीबेरंगी बनवतात. अशाच एका बाजारातून फिरताना टिपलेल्या फोटोंमधून हे पुस्तक तयार झाले आहे. १ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना रंग आणि त्यांच्याशी संबंधित शब्दसंपत्तीचा सहज परिचय करून देणारे हे पुस्तक ग्रामीण आणि शहरी दोन्ही मुलांना आवडेल असे आहे. पुस्तकातील मजकुरासोबतच त्यातील फोटोंचा वापर मुलांशी गप्पा मारायला करता येईल.
Age group: 1 to 4 years
The weekly bazar (market) in the villages is a colorful place due to the vegetables, fruits and spices. With attractive photographs and minimum text, this book is ideal for early readers in 1-4 year age group.