मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ऍक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.
दिवाळीचं वातावरण म्हणजे डोळ्यासमोर येतात उटणं, फराळ, कंदील, पणत्या आणि याचबरोबरच दिवाळी अंकसुद्धा! मराठीतली आपली ही विशेष वाचन-परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने चिकूपिकूचा हा दिवाळी विशेषांक, १ ते ११ मधल्या छोट्या मुलांसाठी काढला आहे. मुलांची दिवाळीची सुट्टी चिकूपिकूबरोबर आणखी स्पेशल होईल.