मुलांची दिवाळीची सुट्टी स्पेशल करणारा चिकूपिकू दिवाळी अंक! मोठ्यांनी छोट्यांबरोबर वाचावा असा खास चिकूपिकू दिवाळी अंक! गोष्टी, चित्र, ऍक्टिव्हिटीज आणि मजा-मस्ती घेऊन आलेला चिकूपिकू दिवाळी अंक!
या वेळच्या दिवाळी अंकात प्रवास हा विषय घेऊन आलो आहोत. मुलांना प्रवासाचं आकर्षण खूप असतं. सतत नावीन्याची गरज असलेला त्यांचा मेंदू, दिसेल ती गोष्ट टिपून घेत असतो. एकंदर प्रवासातली गंमत, मजा, सहप्रवासी, अडचणी, रोमांच आणि आनंद हे सगळंच नंतर खूप काळ ऊर्जा देत राहतं. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची ही सफर नव्या, जुन्या,अनोळखी, धमाल ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदबादची सफर, परग्रहावरची सहल अश्या फॅंटसीज आहेत.
एखाद्या वस्तूचा आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी कसा प्रवास होतो त्याची गंमत आहे, वेगवेगळ्या वाहनांच्या गोष्टी आहेत, भरपूर कोडी आणि खेळ आहेत, चित्रांच्या, रंगवण्याचा activities आहेत आणि 'गाडी आली.. गाडी आली' सारखी ठेक्यात म्हणता येतील अशी गाणीही आहेत.
या गाडीत मुलांचा हात धरून आपणही चढलो आहोत. एकत्र गोष्टी वाचू, गप्पा मारू चित्रं काढू, रंगवू, हातांनी वस्तू बनवू, मस्ती करू, मजा करू! खरं तर आपण सगळेच एकाच गाडीतून जाणारे सहप्रवासी आहोत. एकत्र मिळून आपल्यासाठी आणि मुलांसाठी या प्रवासातल्या गोड आठवणी साठवून ठेवू या.
अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
68 (All four coloured) |
Binding |
Paperback |