Fees : ₹ 1250/- (Per person)
जंगलातली गोष्ट, गोष्टीत गाणी, गाण्यात वाद्यं ... बासरीची सुरावट, जेंबे ड्रमचा ठेका आणि त्यावर ताल देत पुन्हा गाणी! चिकूपिकूच्या या म्युझिकलचा अनुभव खूप वेगळा आणि प्रत्येकाला सुरांवर आणि ठेक्यावर डोलायला लावणारा आहे.
खास छोट्यांसाठी बसवलेल्या दोन नाटुकल्या मुलांना तर आवडतीलच आणि पालकांनासुद्धा लहान होऊन मजा घ्यायला लावतील. गोष्टरंग फेलोशिपचे उत्साही कलाकार सादर करणार आहेत "सगळे जण खेळतात" आणि "डोक्यावर बसेल एवढी शाळा" अशा दोन धमाल नाटुकल्या.
खास छोट्यांसाठी बसवलेल्या दोन नाटुकल्या मुलांना तर आवडतीलच आणि पालकांनासुद्धा लहान होऊन मजा घ्यायला लावतील. गोष्टरंग फेलोशिपचे उत्साही कलाकार सादर करणार आहेत "सगळे जण खेळतात" आणि "डोक्यावर बसेल एवढी शाळा" अशा दोन धमाल नाटुकल्या.
नैसर्गिक गोष्टींपासून धमाल खेळणी आणि चित्रं तयार करू या. नेहेमीच नजरेला पडणाऱ्या गोष्टीसुद्धा किती कल्पकतेने वापरता येऊ शकतात हे बघताना आणि स्वतःच्या हातांनी खेळणी तयार करताना मुलांना खूप मजा येईल.
या वेळी वेगवेगळे धमाल खेळ खेळण्यासाठी खास वेळ ठेवला आहे. मुलं आणि पालकसुद्धा हे भन्नाट खेळ खेळताना खूप मजामस्ती करतील. कार्निव्हलमधून तुम्ही जंगल सफारी करणार आहात त्यामुळे ठिकठिकाणी लपलेले प्राणी,पक्षी नक्की शोधा.
याशिवाय फेस पेंटिंग, खरेदी, खाऊ, गंमत गिफ्टबॅग आणि भरपूर धमाल!
चिकूपिकू कार्निव्हलमध्ये संपूर्ण दिवस मजा करू या, मुलांबरोबर आपणही थोडे छोटे होऊ, धमाल करू!
दिनांक: शनिवार, 8 जून 2024
वेळ: स. 10:00 ते सायं. 5:30
-------------------------------------------------------
स्थळ: झपूर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चर,
खडकवासला बॅक वॉटर, कुडजे, पुणे २३
Fees : ₹ 1250/- (Per person)
*प्रत्येक मुलासाठी गंमत गिफ्ट बॅग!
Note: Outside food is strictly prohibited at the venue. Discounted meal options are available along with the Ticket