चिकूपिकू हे १ ते १० वर्षांच्या नव्या युगातल्या मुलांसाठीचे पहिले मराठी मासिक आहे. प्रत्येक महिन्याला एक नवा कोरा विषय आणि नवीन गोष्टी घेऊन चिकूपिकूचा अंक येतो. मुलांना निरनिराळे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात असतात.
लहान वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो. मुलं मातृभाषेतच विचार करतात. म्हणून चिकूपिकू मुद्दाम मराठीतून मुलांशी बोलतो. चिकूपिकूमधल्या गोष्टी ऐकत, हातातलं रंगीत चित्रांनी भरलेलं पुस्तक बघत बघत मुलांची हळूहळू वाचनाशी, पुस्तकांशी मैत्री होते आणि स्क्रीनटाईमसुद्धा कमी होतो.
स्क्रीन, स्पर्धा, अभ्यास, शाळा या सगळ्यात मुलांना आणि आईबाबांना एकत्र छान वेळ घालवण्याचं निमित्त चिकूपिकू देतो आणि त्यातून आपोआपच गोष्टी - गाणी - वाचन, संवाद, bonding साध्य होण्याची संधीसुद्धा!
अंकातली characters favourite होतात, चिकूपिकू मित्रच बनतो
कोडी सोडवायला, activities करायला आवडतात
अंकातली रंगीबेरंगी, आकर्षक चित्रं बघायला, रंगवायला आवडतात
दर महिन्याला नवीन अंकाची मुलं आतुरतेनं वाट बघतात
चिकूपिकू वाचून मुलांनासुद्धा गोष्टी सुचतात
सोप्या भाषेतलं मासिक मुलांना अलगद गोष्टींच्या दुनियेत नेतं