ChikuPikuChikuPikuChikuPiku

Thinker, doer and dreamer

मला काय हवंय? त्यासाठी काय करावं? याचा विचार या वयात सुरु होतो. एखादी व्यक्ती, गोष्ट बघून मुलं प्रभावित होतात. स्वप्नं बघायला लागतात आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतात.

    चिकूपिकूची मदत आणि वापर

अंकातल्या हातांनी करून बघायच्या ऍक्टिव्हिटीज, वैज्ञानिकांच्या गोष्टी, सोपे प्रयोग, मुलं आवडीने समजून घेतात. गोष्टींमधून नवं जग, नवे लोक त्यांना भेटतात. हे सगळं मुद्दाम मराठीतून म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून असल्याने मुलांना त्या गोष्टी छान समजतात.

मुलांना चिकूपिकू कशी मदत करेल -

 • अंकातील लहान-लहान गोष्टी स्वतः वाचायला मुलांना आवडतील.
 • चित्रं वापरून नव्या गोष्टी रचू शकतील.   
 • नव्या Activities, खेळ, गाणी तयार करू शकतील
 • ऑडिओ स्टोरीज ऐकून हावभाव, आवाजातले चढउतार शिकतील
 • क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्तीचा उपयोग शाळेतही होईल.

Girl Enjoying reading ChikuPiku magazine.
Boy watching mobile phone

    स्क्रीन टाईम

दिवसभरात एक तासापेक्षा जास्त स्क्रीन मुलांना दाखवू नये. मोबाईलपेक्षा टीव्हीवर वयोगटानुसार योग्य कॉन्टेन्ट मुलांना बघायला द्यावा. टीव्ही चालू असताना मोठं कोणीतरी आसपास असणं गरजेचं आहे. दिसभरातली टीव्हीची ही वेळ ठरवून घ्यायला हवी. काही घरात मुलं मोठ्यांबरोबर टीव्हीवरच्या मालिका बघतात. हे टाळणं अत्यावश्यक आहे. त्यातून द्वेष, राग, हेवेदावे अशा नको त्या गोष्टी मुलांच्या कानावर पडतात.

    स्क्रीनच्या ऐवजी काय ?

 • पुस्तकं आणि ऑडिओ गोष्टींचा उपयोग करून घेता येईल.
 • सुट्टीच्या दिवशी बागेत, टेकडीवर फिरायला जाणं, छोट्या ट्रीपला जाणं असं ठरवता येईल.

 • घरातल्या प्रत्येकाने थोडा-थोडा वेळ मुलांना द्यायचा असं ठरवता येईल.
 • रोजच्या कामात मुलांना सहभागी करून घेता येईल. उदा. भांडी लावायला मदत कर, तुझ्या पांघरुणाची घडी घालून ठेव इ.  

 • कधी मित्र-मैत्रिणींकडे आपण जाणं, कधी त्यांना आपल्या घरी बोलावणं. मोठ्यांचं लक्ष असेल पण मुलांना स्वतंत्रपणे खेळता येईल असं बघावं. भांडणं, ती मिटवून पुन्हा मैत्री असे अनुभव त्यांचे त्यांना घेऊ देत.

Group of kids playing outdoor game
Boy smiling while having snacks

    खाणं-पिणं आणि वाढ

या वयामध्ये वजन, उंची वाढते, ताकद वाढते. या वयात प्रथिनं (proteins) आणि जीवनसत्वं महत्त्वाची आहेत.

काही टिप्स:

 • ओला नारळ महत्त्वाचा - ओल्या नारळामध्ये मेंदूच्या वाढीसाठी लागणारे चांगल्या प्रतीचे फॅट्स असतात. मुलांनी शक्यतो दररोज ताजा ओला नारळ खायला हवा.
 • मेंदूतील सिग्नलिंग नीट होण्यासाठी उच्च दर्जाची प्रथिनं गरजेची असतात. मिश्र डाळींचा वापर, मोडाची कडधान्य, अंडी, दूध, पनीर आहारात असायला हवेत.  
 • साखरेच्या नियमित वापरामुळे मेंदूची क्रिया मंदावते. शरीरात acidity वाढते. त्यामुळे मेंदूला पुरेश्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सतत झोप येणं , मरगळल्यासारखं वाटणं हे त्रास होतात.

  झोप महत्त्वाची

या वयात मुलांना साधारण 9-10 तासांची झोप आवश्यक असते. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स झोपेतच तयार होतात.

झोपताना काय करावं ?

 • मुलांनी रात्री लवकरात लवकर झोपायला हवं. रात्री १० आणि त्यापुढच्या वेळा मुलांनी घड्याळात खरंतर बघायला नकोत
 • मुलांची झोपण्याची जागा निश्चित असावी. 
 • झोपेची वेळ ठरवून घ्यावी. ती वेळ घरातल्या माणसांनी पाळावी.
 • पडदे लावून, दिवे घालवून, शांत गाणी किंवा गोष्ट सांगत मुलांना झोपवता येईल
 • झोपताना मुलांना स्क्रिन अजिबात दाखवू नये.

Girl sleeping with teddy a bear in her arms
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page