या वयातल्या मुलांच्या मेंदूचा शिकण्याचा वेग अफलातून असतो. हे असं का? ते तसं का? भरपूर प्रश्न त्यांना पडतात. नवीन वस्तू हाताळणं, आजूबाजूच्या गोष्टी कशा घडतात हे पाहणं या मुलांना फार आवडतं.
अंकातल्या संशोधकांच्या गोष्टी, प्रयोग, चित्रांच्या ऍक्टिव्हिटीज, निसर्गातल्या अद्भुत गोष्टी या मुलांना आवडतील. गोष्टींमधून बऱ्यावाईटाची समजही यायला मदत होते. नवनवीन शब्दांचा संग्रह वाढायला आणि मनात जे येतं ते शब्दात मांडायला गोष्टींचा खूप उपयोग होतो.
   चिकूपिकूची मदत आणि वापर

   स्क्रीन टाईमदिवसभरात एक तासापेक्षा जास्त स्क्रीन मुलांना दाखवू नये. जेव्हा स्क्रीनटाईम असेल तेव्हा मोबाईलपेक्षा टीव्हीवर वयोगटानुसार योग्य कॉन्टेन्ट मुलांना बघायला द्यावा. टीव्ही चालू असताना मोठं कोणीतरी आसपास असणं गरजेचं आहे. दिवसभरातली टीव्हीची ही वेळ ठरवून घ्यायला हवी. काही घरात मुलं मोठ्यांबरोबर टीव्हीवरच्या मालिका बघतात. हे टाळणं अत्यावश्यक आहे. त्यातून द्वेष, राग, हेवेदावे अशा नको त्या गोष्टी मुलांच्या कानावर पडतात.
   स्क्रीनच्या ऐवजी काय ?

   खाणं-पिणं आणि वाढया वयामध्ये वजन, उंची वाढते, ताकद वाढते. या वयात प्रथिनं (proteins) आणि जीवनसत्वं महत्त्वाची आहेत.
   झोप महत्त्वाचीमुलांना दिवसभरात साधारण १२ तासांची झोप आवश्यक असते. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स झोपेतच तयार होतात. मुलं दिवसभरात एखादी डुलकी घेऊ शकतात आणि रात्री सलग झोपतात.
