डोकं लढवून, चर्चा, वादविवाद या सगळ्यांतून आपण आपल्या पिल्लाचं नाव ठेवतो. घरातल्या या लाडोबाची कितीतरी लाडाची नावं असतात. नावं, टोपणनावं' हा मजेशीर आणि जिव्हाळ्या चा विषय या अंकात मांडत आहोत. त्या निमित्ताने मुलाांच्याच नाही तर नातेवाईक, प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांच्या नावांच्या गप्पा मारू या, किस्से, आठवणी साांगू या. याशिवाय नाव ठेवणं आणि नावं ठेवणं यात एका अनुस्वाराचा असणारा हा छोटासा पण अर्थानी महत्त्वाचा फरक नक्की ओळखू या आणि मुलाांना पण तो सहजपणे शिकवू या. अंकात आपली टोपण नावं शोधतं, गाणी गात, गोष्टी वाचत मुलांबरोबर भरपूर वेळ घालवा. आणि अंक कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.