माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.
बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही गंमत गोष्ट.
मायेनी विणलेली ही शाल मुलांना रंगीबेरंगी चित्रांमुळे नक्की आवडेल. यातून मुलांना आपल्या नात्यांची जाणीव होईल आणि आपल्याबरोबर प्राण्यांवरही प्रेम करावे हेही कळेल.
१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया
3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील
६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील