Set of 2 Board Books
ही दोन बोर्ड बुक्स आहेत. अगदी लहान मुलांना सहज हाताळता येतील अशी ही पुस्तकं.
हॅॅत्तेच्या!!
एक छत्री लहान मुलाला दिल्यावर तो काय काय प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो याची मनोरंजक गोष्ट ‘हॅत्तेच्या’ मध्ये चितारली आहे. ते बघून मुले खुश होतील यात शंकाच नाही.
किती काम केलं!:
लहान मुले नकळतपणे आपले निरीक्षण करत असतात आणि मग वेळ येताच त्यांच्या बुद्धीला सुचेल तसे आपले अनुकरणही करतात. हीच गोष्ट ‘किती काम केलं!’ या पुस्तकात सांगितली आहे. मुलाने केलेलं काम पाहून त्याला रागवावं की या बाललीलांचे कौतुक करावे हे प्रश्न सर्वांना नक्कीच पडेल.
या गोष्टी पाहून आणि ऐकून आपल्या घरातही काही प्रयोग झाले तर आम्हाला जरूर सांगा.