जून महिन्याच्या अंकाचा विषय आहे ‘शाळा’. 'शाळेचा पहिला दिवस’ या तीन शब्दांत किती तरी भावना, आठवणी, नाट्य, हसू आणि अश्रू भरलेले आहेत ना! आपल्या शाळेचा पहिला दिवस ते आता आपल्या मुलांच्या शाळेचा पहिला दिवस हा खूप मोठा प्रवास करून आपण आलो आहोत. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. छबी आणि बागुलबुवा गोष्ट २. हातांची जादू ऍक्टिव्हिटी ३. मिशीवाली आई गोष्ट ४. कोडी वेडी
शाळेतल्या शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव मुलांवर असतो. “मला अमुक ताई/टीचर खूप आवडतात. आज ताई असं म्हणाल्या.” अशा वाक्यांमधून ते जाणवतं. या अंकात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, गिजुभाई बधेका अशा मुलांवर अतोनात प्रेम करणाऱ्या शिक्षकांच्या आणि त्यांच्या प्रयोगशील शाळांच्या गोष्टी आहेत. रेणुताई गावस्कर यांनी पालकांसाठी लिहिलेला लेख आवर्जून वाचावा असा आहे.
या अंकासोबत शाळेच्या नवीन वर्षाची छानशी सुरुवात करू या.
चिकूपिकू जून २०२३ अंक
शाळेची सुरवात म्हणजे गडबड, धाकधूक, कुतूहल आणि मजा
या अंकासोबत शाळेच्या नवीन वर्षाची छानशी सुरुवात करू या!