आपल्या लहानपणी 'ज्युरासिक पार्क'मधून डायनोसॉरची ओळख आपल्याला झाली आणि या महाकाय प्राण्यांविषयी वेगळीच भीतीमिश्रित उत्सुकता तयार झाली. आत्ताच्या मुलांनाही डायनॉसॉर्सचं तेवढंच आकर्षण आहे जेवढं आपल्याला होतं. त्यांचा अवाढव्य आकार, वेगवेगळे प्रकार, पृथ्वीवरून गायब होऊन जाणं या
सगळ्यातली गूढ पण भारी वाटणारी गंमत मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा खास अंक काढत आहोत. याविषयी भरपूर माहिती इंटरनेटवर आहे त्यामुळे काल्पनिक ड्रॅगन आणि लुप्त झालेले डायनॉसॉर्स, यांच्या गमतीशीर गोष्टी अंकात देण्याचा प्रयत्न केला आहे. डायनोबाबरोबर धमाल करत मुलांबरोबर हा अंक वाचा आणि
तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा.