चिकूपिकू मासिकातून गेली चार वर्षे या चित्रकृती मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांचा आनंद मुलांनी घेतला आहे. बोटांची पकड तयार होऊ लागलेल्या कोवळ्या वयाच्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना या चित्रकृती नव्या वाटतील. हाता पायांच्या बाह्यरेषा , ठशांमधून देखील चित्र काढता येऊ शकतात , त्यासाठी प्रत्येकवेळी हात रंगात बुडवणं , ते धुणं शक्य असेल किंवा नाही असा विचार करून बाह्यरेखांची चित्र करायचा निर्णय घेतला. ज्यांना शक्य असेल त्यांनी ठश्यातून चित्र जरूर करून बघावी.