तोत्तोचान चक्क एका रेल्वेच्या जुन्या डब्यात भरणाऱ्या शाळेत जायला लागली होती ! तिथले विषय, शिकण्याची पद्धत, तिथल्या सहली, तिचे मित्रमैत्रिणी आणि तिचे अफलातून शिक्षक हे सगळेच जगावेगळे होते. गोष्ट ऐकत, गाणी गात, नाचत आपण या तोमोई शाळेची सफर करू या का? तोत्तोचान या प्रसिद्ध पुस्तकातल्या छोट्या तोत्तोचानला भेटायला, तिच्या या वेगळ्याच शाळेबद्दल ऐकायला, बघायला नक्की या ! सगळ्या छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी आणि शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी हा खूप सुंदर अनुभव असणार आहे. वाट बघतोय...
हे नाटक अनेक पुरस्कारप्राप्त असून प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुण्यात त्याच दिवशी संध्याकाळी 7:45 वाजता अजून एक विशेष प्रयोग आयोजित केला आहे.
तारीख: 25 डिसेंबर 2025
वेळ: संध्याकाळी 7:45 वाजता
स्थळ: द बॉक्स, पुणे
तिकीट : 350/- प्रत्येकी
तिकिटासाठी संपर्क: 9307874027