चार पुस्कांचा संच
वाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!
प्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.
४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड, २. लीला आणि फुलपाखरू, 3. बोबू आणि अंड, ४.भोपळ्याची बी)
अक्षर ओळख नसलेल्या मुलांना चित्रं दाखवून गोष्ट सांगूया. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील. प्रत्येक गोष्टी नंतर दिलेली activity मुलं सोडवू शकतील.
या गोष्टी वाचून निसर्गातील वेगवेगळे प्रश्न मुलांना पडतील. मोठ्यांना मात्र त्याची पटतील अशी उत्तरं द्यावी लागतील☺
अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील. इतर प्राणी, पक्षी, झाडं आणि निसर्गाविषयी मुलं अधिक संवेदनशील होतील