पालकांची शाळा
चांगले आईबाबा होणं म्हणजे नक्की काय?
– रेणुताई गावस्कर
शेकडो मुलांची आई असलेल्या रेणूताई गावस्कर या ज्येष्ठ मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. वंचित मुलांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण असे आहे. त्यांचा व्यासंगही दांडगा असून मराठी, इंग्रजी साहित्याचा तसेच अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचादेखील त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. चांगला पालक होणं म्हणजे काय? त्यांच्या कामातून, मुलांमध्ये राहून आणि वाचनातून त्यांना उमजलेलं पालकत्व त्यांच्या ओघवत्या शैलीतून ऐकायला आणि त्यांच्याशी थेट संवाद साधायला नक्की या.