गरवारे बालभवनने ‘गरज,सोय,चैन’ हा सुंदर खेळ तयार केला आहे. त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे ५२ पत्ते आहेत. प्रत्येकाने ती वस्तू आपली गरज आहे, सोय आहे का चैन आहे, हे ठरवायचं. आपल्या खऱ्या गरजा ओळखणं आणि जमतील तितक्या चैनीच्या वस्तू कमी करणं हा खेळामागचा उद्देश. Consumption कमी तर कचरा कमी! खेळातून मुलांबरोबर ह्याविषयी सहज गप्पा होतील. नक्की खेळून बघा.