गेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो, समुद्रात राहणारी फिशिरा याशिवाय अंतराळ आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची सफरसुद्धा या बोर्ड गेम्समधून घडणार आहे. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील, प्रवासातही बरोबर घेऊ शकाल आणि लहानांबरोबर मोठ्यांनाही हे खेळ खेळताना मजा येईल.
सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.
(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)