चिकूपिकू डिसेंबर अंका मध्ये तऱ्हेतऱ्हेच्या संवाद साधण्याच्या पद्धती मजेशीर रीतीने दाखवल्या आहेत, प्राण्यांचा, झाडांचा निसर्गातला संवाद आहे, धमाल कोडी आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या शैलीतील चित्रही अनेक गोष्टी सांगत आहेत. या सगळ्याची मजा मुलांबरोबर आपणही घेऊ या.
चिकूपिकू डिसेंबर अंका मध्ये संवाद हा विषय मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर प्राण्यांत आणि माणसात असलेला महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाची संवाद साधण्याची कला. अगदी लहान मुलंसुद्धा खाणाखुणा, रडणं-ओरडणं यातून काहीतरी सांगत असतात. त्यांना काय कळतंय?’ असं म्हणत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न करता, अगदी लहान वयापासून मूल ते पालक हा संवादाचा धागा आपल्याला जोडून घ्यायला लागतो. हा दुहेरी संवाद अविरत चालू ठेवायला लागतो. तरच मुलं आणि आपण मनातल्या गोष्टी, विचार, शंका निश्चिन्तपणे एकमेकांना सांगत राहू शकू. योग्य वेळचा सुसंगत संवाद शाळेत, कामात, नात्यांमध्ये, अगदी सगळीकडेच महत्त्वाचा असतो हे मुलांना दाखवू शकू.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |