चिकू-पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू-पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनीनेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक वर्षाच्या छोट्यांनाही आवडेल आणि आठव्या – नवव्या वर्षापर्यंतही आवडेल अशी भरपूर मज्जा अंकात असणार आहे. वाढदिवस स्पेशल गाणी, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज मुलांना आवडतील. अंकासोबत चिकूचा मुखवटा आणि हाताने करून बघायचं एक छोटं पझलसुद्धा दिलं आहे.
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करण हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
नोट: चिकूपिकू मासिकाच्या वार्षिक वर्गणीमध्ये ( Yearly Subscription) सुट्टी विशेषांक आणि दिवाळी विशेषांक हे मोठे जोड-अंक समाविष्ट केलेले आहेत.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
ISSN |
RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |