चिकूपिकूच्या पाचव्या वाढदिवसाचा हा खास अंक! लहान मुलांसारखीच चिकूपिकूला वाढदिवसाची उत्सुकता असते. या अंकातून वाढदिवसाची धमाल, मजेशीर गोष्टी, कोडी, पाच आकड्यापासूनची चित्रं आणि activities शिवाय काही चित्रांची स्टिकर्स अशी भरपूर गंमत मुलांच्या भेटीला घेऊन आलो आहोत.
गेली पाच वर्षं चिकूपिकूबरोबर दुडूदुडू धावत कधी गेली कळलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने चिकूपिकूला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलंत. चिकूपिकूशिवाय आमचा दिवसच सरत नाही असं जेव्हा आईबाबा सांगतात तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो आणि हुरूपही येतो. सहाव्या वर्षातल्या या अंकापासून गोष्ट ऐकून झाल्यावर मुलं नक्की काय विचार करतात हे समजण्यासाठी मुद्दाम काही ऍक्टिव्हिटीज/प्रश्न देत आहोत. अंक नक्की घ्या, वाचा आणि मुलांच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा.
अंकात असलेल्या गोष्टी खूपच लक्षवेधी आहेत, प्रौढ व्यक्ती सुद्धा रमतात