"घाबरगुंडी" हा थोडा वेगळा विषय अंकातून घेऊन येत आहोत. भीतीची भावना नैसर्गिक आहे. स्वसंरक्षणासाठी ती गरजेची आहे. अगदी चिमुरडी मुलंसुद्धा जोपर्यंत त्यांना सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत अनोळखी व्यक्तीकडे जात नाहीत. अंकातल्या भीतीच्या गंमतशीर गोष्टी, गाणी मुलांना आणि मोठ्यांन ही आवडतील. भीतीला वाट करून देणाऱ्या काही अॅक्टिव्हिटीजदेखील अंकात आहेत. भुताच्या गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात, त्यासुद्धा अगदी हलक्याफुलक्या आहेत. चित्रं बघताना, गोष्टी वाचताना भीती वाटण्यापेक्षा मजा कशी येईल याचा विचार केला आहे. तरीदेखील मुलांना एखाद्या पानावर थांबावंसं नाही वाटलं तर पुढच्या पानावर जाऊ या. अंकाच्या निमित्ताने आपल्या आणि मुलांच्या भीतीचा विचार केला जाईल, गप्पा होतील, तोडगे सुचतील. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना, प्रश्न नक्की कळवा.