सुट्टी म्हणजे धमाल! मुलांची जरी परीक्षा संपली तरी पालकांची परीक्षा सुरू झालेली असते आणि ह्या परीक्षेचा मुख्य प्रश्न असतो. "आता मी काय करू?" हो ना ?!
म्हणूनच तुमच्या मदतीला येणार आहे हा अंक जो मुलांना गुंतवून ठेवेल, सुट्टीसाठी डोक्याला छान खाद्य पुरवेल.
दुपारच्या वेळी मित्र गोळा करून किंवा आईबाबांबरोबर, आजीआजोबांबरोबर गोष्टी वाचणं, QR कोड स्कॅन करून गाणी ऐकणं, त्यांच्यासोबत ऍक्टिव्हिटीज करणं, कोडी सोडवणं या सगळ्यात मुलांना खूप धमाल येईल.
मग या सुट्टीत उन्हाचा त्रास विसरून, "आत काय आहे" हे शोधायला तयार आहात ना?
आई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं?
भंडावून सोडतात मुलं प्रश्न विचारून, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येतात पण तरी त्यांचे भन्नाट प्रश्न आठवून आपल्याला हसू येतंच. मुलांची उत्सुकता वाढवेल, काही प्रश्नांची उत्तरं देईल आणि पालकांनाही मुलांबरोबर वाचायला मजा येईल असा हा खास सुट्टी विशेषांक घेऊन येत आहोत ज्याचा विषय आहे 'आत काय आहे?'

मजेदार गोष्टी
भन्नाट गाणी
चित्र गोष्टी
ऍक्टिव्हिटीज आणि कोडी
कुतूहल, उत्सुकता ही प्रत्येक गोष्ट शिकण्याची पहिली पायरी आहे आणि यांचे बोट धरुनच मुलं आयुष्यातील प्रत्येक पायरी चढत असतात. पिशव्या, बॉक्सेस, अडगळीच्या खोलीपासून ते समुद्राच्या तळापर्यंत प्रत्येकाच्या आत काय आहे जाणून घेण्यासाठी मुलं प्रश्नांचा भडीमार करत असतात.
तुम्ही कधी एखादा किल्ला बघितला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरून राज्यकारभार केला पण त्यासाठी आणि शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी या किल्ल्यांच्या आत नक्की काय काय असायचं? सुंदर चित्रांतून ही माहिती अंकात दिली आहे आणि शिवाय रामशेज नावाच्या किल्ल्याची आणि ६०० बहाद्दर मावळ्यांची गोष्टसुद्धा यात आहे.
फ्रिजचं दार बंद झाल्यावर त्याच्या आतल्या भाज्या काय करत असतील? एकमेकांशी बोलत असतील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच त्याचं उत्तर या गोष्टीत मिळेल !!
अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका आणि ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी मुलांसाठी अगदी सोप्या, गोड भाषेत लिहिलेली कविता 'एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात' या अंकात नक्की वाचा. सुंदर चित्रातून या 'बी ते झाड' हा प्रवाससुद्धा बघायला मिळेल.
गजल नाकात करंगळी घालताना दिसली तशी तिची अम्मी ओरडली "गज्जो नाकात बोटं नको घालू, नाहीतर तुझं नाक हिप्पोसारखं होईल." बापरे .. हिप्पोचं नाक नक्की कसं असतं? पुढे काय गंमत झाली हे फारूक काझींच्या या गोष्टीतच कळेल !
तुम्ही कधी एखादा किल्ला बघितला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरून राज्यकारभार केला पण त्यासाठी आणि शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी या किल्ल्यांच्या आत नक्की काय काय असायचं? सुंदर चित्रांतून ही माहिती अंकात दिली आहे आणि शिवाय रामशेज नावाच्या किल्ल्याची आणि ६०० बहाद्दर मावळ्यांची गोष्टसुद्धा यात आहे.
अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका आणि ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी मुलांसाठी अगदी सोप्या, गोड भाषेत लिहिलेली कविता 'एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात' या अंकात नक्की वाचा. सुंदर चित्रांतून 'बी ते झाड' हा प्रवाससुद्धा बघायला मिळेल.
फ्रिजचं दार बंद झाल्यावर त्याच्या आतल्या भाज्या काय करत असतील? एकमेकांशी बोलत असतील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच त्याचं उत्तर या गोष्टीत मिळेल !!
गजल नाकात करंगळी घालताना दिसली तशी तिची अम्मी ओरडली "गज्जो नाकात बोटं नको घालू, नाहीतर तुझं नाक हिप्पोसारखं होईल." बापरे .. हिप्पोचं नाक नक्की कसं असतं? पुढे काय गंमत झाली हे फारूक काझींच्या या गोष्टीतच कळेल !
₹2100/- ₹1499/-
₹325/- ₹299/-