QUEST ही संस्था मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून 2007 पासून कार्यरत आहे. मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागण्यासाठी पुस्तकं खूप महत्त्वाची असतात. क्वेस्टने मुद्दाम विचारपूर्वक 3 ते 8 वयोगटातल्या मुलांसाठी मराठी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही पुस्तकांत अगदी कमी मजकूर आहे – मुलांना अक्षरओळख होऊ लागली की ती स्वतःच वाचू लागतील. तुम्ही तुमच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवा आणि त्यांच्या सोबत मजेत वेळ घालवा.
ग्रामीण भागातला आठवडी बाजार म्हणजे रंगांची उधळण असते. भाजीपाला, फळे, मसाले, कपडे अशा शेकडो वस्तू या बाजाराला रंगीबेरंगी बनवतात. अशाच एका बाजारातून फिरताना टिपलेल्या फोटोंमधून हे पुस्तक तयार झाले आहे....