पत्र लिहिणं आणि कोणाला पाठवणं हल्ली फार दुर्मिळ झालं आहे. 'पत्र' या पुस्तकात पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगितली आहे. एक लहान मुलगी तिच्या आजोबांना पत्र लिहिते. ते पत्र तिच्या घरून आजोबांच्या घरी कसं पोहोचतं तो सगळा प्रवास पत्राच्या दृष्टीकोनातून लेखकाने सादर केला आहे. जोडीला छान चित्रंही आहेत. हे पुस्तक ३ ते ८ वर्षे वयाच्या मुलांसाठी आहे.
Age group : 3 to 8 years
The story of a letter's journey, from the writer to the receiver. Suitable for 3-8 year age group.