ऑगस्ट अंकातून ‘शेपूट’ हा अतरंगी विषय घेऊन आलो आहोत. इवलीशी, लांबलचक, झुपकेदार.... प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्यांची लहान मुलांना भारी गंमत वाटते. शेपट्यांची ही धमाल; गोष्टी, गाणी, चित्रं आणि ऍक्टिव्हिटीजमधून अनुभवताना मुलांना नक्की मजा येईल. अंकात काय वाचाल आणि कराल ? १. म्हण म्हण म्हणी २. चिमणी चित्र ऍक्टिव्हिटी ३. उकाकी गोष्ट ४. हॅलो मी खारू ताई कविता ५. कोलाज काम ६. रोबी
लहान मुलांना शेपटीचं आकर्षण जरा जास्तच असतं, कदाचित तिच्या वैविध्यामुळे... आणि ती आपल्याला नसल्यामुळे! तसं पाहिलं तर आपली मुलं म्हणजे आपल्या शेपट्याच आहेत. प्रत्येकाचं शेपूट वेगळं. शेपटासारखी स्वारी खुश असली की डोलणारी, चिडली की फटकारणारी, तर कधी घाबरून फूस होऊन शांत बसणारी. पण आपल्या या शेपट्याच आपल्याला तोल सांभाळत चालायला शिकवतात. मायेची ऊब देतात. या अंकातून शेपट्यांची धमाल मजा घेऊन आलो आहोत. ती मुलांना आणि तुम्हाला आवडेल असं वाटतंय. अंकातली कुठली गोष्ट आवडली? कुठल्या चित्रांवर गप्पा झाल्या? अजून नवीन काय वाचायला आवडेल? आम्हाला नक्की कळवा.
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
Binding |
Paperback |