या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.
भुकेला क्रेनी:
क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट
पहिला पाऊस:
सीता नावाच्या हत्तीच्या पिल्लाला पाऊस कसा असतो तेच माहित नाहीये. तिनी पाहिलेला पहिला पाऊस कसा होता?
१ ते २ वर्षाच्या चिमुरड्यांना चित्रं बघायला नक्कीच आवडतील. जेवण भरवताना टीव्ही किंवा मोबाईलपेक्षा या गोष्टी मुलांना चं गुंतवतील.
3 ते ५ वर्षाच्या मुलांना निसर्ग आणि प्राणांच्या गोष्टी फार आवडतात. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून परत-परत वाचू शकतात. चित्र वाचनाची हीच सुरवात आहे.
६ ते ११: इंग्रजी माध्यमातील मुलांना या छोटया मराठी गोष्टी वाचायला आवडतील. मुलं या गोष्टींकडे कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने बघू शकतील