तुम्ही लहानपणी झोका खेळला असेलच… पण कधी एखादी गाय झोका खेळताना पाहिली आहे का?
कपिला गाय नेहमी काहीतरी नवीन, गंमतीशीर करू पाहते. तिच्या या भन्नाट कल्पनांमध्ये तिला साथ देतो तिचा खास मित्र – कावळा!
कपिला गाय आणि कावळ्याची ही मजेशीर गोष्ट मुलांना तर नक्कीच आवडेल, पण मोठ्यांनाही हसवेल आणि आनंद देईल अशी ही नाटुकली आहे.
यासोबतच चिकूपिकू मासिकात गोष्टी लिहिणाऱ्या नभाताई मुलांसाठी खास Storytelling Session घेऊन येत आहेत.
म्हणजेच नाटुकली आणि Storytelling Session – असा डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे.
नाटक सादरकर्ते: संतोष गायकवाड, प्रवीण पारधे
Storytelling Session : नभा केसकर
कार्यक्रमाचे नाव: चिकूपिकू नाटुकली – कपिलेने घेतला झोका
वयोगट: 3+
तारीख: 28 डिसेंबर 2025
वेळ: संध्याकाळी 5 ते 6
स्थळ: गरवारे बालभवन, छत्रपती संभाजीनगर
तिकीट: ₹120 (प्रत्येकी) / ₹200 (मुल + पालक)
मर्यादित जागा