चिकूपिकूचा हा चौथा वाढदिवस स्पेशल अंक! वाढदिवस म्हणजे एकत्र येणं, एकमेकांना भेटी देणं, भरपूर मज्जा-मस्ती करणं यातून व्यक्त होणारा आनंद, प्रेमाची भावना मुलांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून हा अंक मुलांसाठी खूप खास असणार आहे. चार वर्षांच्या मुलांमध्ये जशी भरपूर उर्जा असते, त्यांना सतत नवनवीन गोष्टी हव्या असतात तसंच या चिकूपिकूद्वारे आम्ही मुलांना अनेक नवनवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. हा अंक चहूबाजूंनी मुलांना कल्पक बुद्धी आणि शोधक वृत्तीची ओळख करवून देणारा आहे. त्यामुळे पालकांनाही मुलांसह हा अंक वाचण्यास नक्कीच मज्जा येईल.
या अंकातून आसपास दिसणाऱ्या प्राण्यांची ओळख, वाढदिवसाची गंमत, तयारी आणि उत्सुकता, रंगीत मोठ्ठी चित्रं, चित्रात दडलेल्या गोष्टी, चित्रंकोडं, घरी सहज करता येतील असे गमतीदार प्रयोग तर आहेतच, सोबत हातांनी करता येईल असं लपंडावाचं खेळणं पण आहे.
आतापर्यंत छोट्या दोस्तांनी आणि पालकांनी चिकूपिकूला भरभरून प्रेम दिलंय. यातूनच आम्हाला सतत प्रेम, प्रोत्साहन आणि प्रचंड उर्जा मिळतेय. या प्रवासात ही सोबत अशीच कायम ठेवू या, चिकूपिकूसह मोठं होऊ या, मुलांचं बालपण समृद्ध करू या !
Age Group |
1+ |
---|---|
Language |
Marathi & English |
No. of Pages |
40 |
Binding |
Paperback |