मोठ्या मोठ्या दुर्बिणीतून चंद्र आणि ग्रह, तारे बघायला, आकाशातल्या इतर गमती-जमती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? शहरापासून थोडंसं दूर जाऊन, रात्रीच्या आकाशात किती चमचम चांदण्या असतात, नक्षत्रं असतात, त्यांच्या काही छान गोष्टी ऐकायला आवडतील का?
ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या तज्ज्ञ मंडळींकडून भरपूर माहिती देणारा आणि मुलांना आकाशाशी ओळख करून देणारा हा एक वेगळाच कार्यक्रम चिकूपिकूतर्फे घेऊन येतोय. मुलांना आणि आईबाबांना एक भन्नाट अनुभव देणारा हा कार्यक्रम चुकवू नका, लवकरच आपली तिकिटे बुक करा.
मनाली अग्रो फार्म येथे संध्याकाळी ७ पासून टेलिस्कोपमधून आकाशदर्शन चालू होईल जे माहिती ऐकत, ऍक्टिव्हिटीज करत रात्री ११ पर्यंत चालू राहील. सोयीनुसार तुम्ही आधीही परत निघू शकता. तिकिटामध्ये जेवण आणि चहा/कॉफी समाविष्ट आहे.
If opting for Gpay, please send screen shot of Gpay payment on this No. 9172136478